e-Paper सोमवार, फेब्रुवारी 12, 2018

शिनोळीमधील यात्रेत रोषणाईसह डॉल्बी, डिजिटल फलकांना फाटा 

सुनील कोंडूसकर
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

चंदगड - शिनोळी (ता. चंदगड) येथे शुक्रवारी (ता. 16) श्री देव चव्हाटा यात्रा होत आहे. ही यात्रा डिजिटल फलक मुक्त तसेच डॉल्बी व रोषणाईमुक्त साजरी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी एकमुखी घेतला.

चंदगड - शिनोळी (ता. चंदगड) येथे शुक्रवारी (ता. 16) श्री देव चव्हाटा यात्रा होत आहे. ही यात्रा डिजिटल फलक मुक्त तसेच डॉल्बी व रोषणाईमुक्त साजरी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी एकमुखी घेतला. तहसिलदार शिवाजी शिंदे, पोलिस निरीक्षक अशोक पवार, तहसिलदार एस. डी. सोनवणे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

दर पाच वर्षांनी ही यात्रा होते. अलिकडच्या काळात यात्रांना आलेले ओंगळवाणे स्वरुप भाविकांसाठी त्रासदायक ठरत आहे. डिजिटल फलकांचा बाजार, डॉल्बीचा दणदणाट यामुळे मानसिक त्रास होतो. रोषणाईमुळे विजेची उधळण होते. ती टाळण्याची गरज असल्याचे मत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी मांडले. त्याला सर्वांनी सहमती दर्शवली.

तहसिलदार श्री. शिंदे म्हणाले, ""ग्रामस्थांनी घेतलेला हा निर्णय इतर गावांसाठी अनुकरणीय आहे. यात्रा काळात कायदा व सुव्यवस्था राखून आनंद लुटावा. प्रशासन आपल्या परीने सेवा पुरवण्यास तत्पर आहे.''

पोलिस निरीक्षक श्री. पवार म्हणाले, ""यात्रेसाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला जाईल. ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य करावे.'' गटविकास अधिकारी श्री. सोनवणे म्हणाले, ""पंचायत समितीतर्फे स्वच्छ पाणी व आरोग्य यासाठी सेवा पुरवण्यात येईल. ग्रामस्थांनी आणि येणाऱ्या भाविकांनी स्वच्छता राखण्याची गरज आहे.''

बाळासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. या यात्रेचे वैशिष्ट्य आणि ती साजरी करीत असताना प्रत्येकाचे कर्तव्य व जबाबदारी याची जाणीव करुन दिली. पंच कमिटीचे अध्यक्ष भरमा पाटील यांनीही मार्गदर्शन केले.

पंचायत समिती सदस्या रुपा खांडेकर, सरपंच नम्रता पाटील, उपसरपंच गुंडू करटे, भारती पाटील, तानाजी खांडेकर, गजानन पाटील, भैरु खांडेकर, जयश्री तळवळकर, प्रताप सूर्यवंशी, निंगाप्पा पाटील, भरमा पाटील, शामराव पाटील, वैजनाथ पाटील, परशराम मेणसे, लक्ष्मण किटवाडकर, भीमराव करटे, यलुप्पा करटे, मारुती पाटील, निंगाप्पा मनोळकर, लक्ष्मण बिरजे, सुरेश कोकीतकर, दादा ओऊळकर, भावकू पाटील, यलाप्पा खांडेकर, ईश्‍वर तोडकर, गणपती पाटील, नारायण कोकीतकर, राहूल पाटील उपस्थित होते. 

Web Title: Kolhapur News No Dolby in Shinoli Chavata Yatra

Kolhapur News No Dolby in Shinoli Chavata Yatra शिनोळीमधील यात्रेत रोषणाईसह डॉल्बी, डिजिटल फलकांना फाटा  | eSakal