संभाजी तलावाच्या सुशोभीकरणासाठी 5 कोटी निधी
प्रदूषण थांबले तरच सुशोभीकरणाला अर्थ
संभाजी तलाव आणि परिसरातील प्रदूषण थांबावे यासाठी सकाळ सातत्याने प्रयत्न करीत आहे. महापालिकेच्या माध्यमातून लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. प्रदूषण थांबविण्यासाठी नेमके काय करायला हवे याबाबतची मालिका सकाळने प्रसिद्ध केली आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी तलावाच्या सुशोभीकरणासाठी निधी मंजूर करून आणला ही चांगली गोष्ट आहे, पण तलावातील प्रदूषण थांबल्याशिवाय सुशोभीकरणाला काहीच अर्थ नाही अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
सोलापूर : "सकाळ'ने हाती घेतलेल्या प्रदूषणमुक्त संभाजी तलाव अभियानामुळे सकारात्मक बदल होताना दिसत आहेत. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पाठपुरावा केल्याने संभाजी तलावाच्या सुशोभीकरणासाठी राज्यशानाकडून 5 कोटी निधी मंजूर झाला आहे. सुशोभीकरण कामासाठी पहिल्या टप्प्यात 50 लाख निधी वितरित करण्यात आला असून लवकरच या कामाला सुरवात होणार आहे.
सोलापूरचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संभाजी तलावाचे सौंदर्य प्रदूषणामुळे लयास गेले आहे. "सकाळ'च्या प्रदूषणमुक्त संभाजी तलाव अभियानामुळे महापालिकेने वसंत नगर, जवान नगर परिसरातून तलावात जाणारे ड्रेनेजचे पाणी पूर्णपणे बंद केले आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरातील संभाजी आणि परिसराचा तलावाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास केल्यास स्थानिकांना आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना तलावाकाठच्या निसर्गरम्य परिसराचा आनंद घेता येणार आहे. याचबरोबर शहराच्या वैभवात भर पडेल. सुशोभीकरण कामासाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पाठपुरावा केला. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत सन 2017-18 मधून पहिल्या टप्प्यात संभाजी तलावासाठी 50 लाख निधी दिला असून पुढील निधी टप्प्याटप्याने मिळणार आहे. शहराच्या वैभवात भर पडणाऱ्या संभाजी तलावाचे सुशोभीकरणास कोटींचा निधी मंजूर झाल्यामुळे सोलापूर शहर व परिसरातील नागरिकांकडून आनंद व्यक्त होत आहे.
"सकाळ'च्या प्रदूषणमुक्त संभाजी तलाव अभियानामुळे महापालिकेने जवान नगर, वसंत नगर परिसरात स्वच्छता केली. तसेच तलावात मिसळणारे ड्रेनेजचे पाणी बंद केले. आता सहकार मंत्री देशमुख यांनी पाठपुरावा करून निधी मिळविल्याने सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. सुशोभीकरणाच्या कामाला लवकरात लवकर सुरवात व्हावी अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.