e-Paper सोमवार, फेब्रुवारी 12, 2018

अमरावती जिल्ह्यात गारपीटसह पाऊस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

या गारपिटीमुळे मृगबहाराचे सध्या दिसत नसले; तरी काही दिवसांत नुकसान होण्याचे संकेत आहेत. आंबिया बहार या गारपिटीमुळे गळून पडण्याचा धोका असून त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे.

अमरावती : जिल्ह्याच्या चांदूरबाजार, अचलपूर, चिखलदरा, धारणी, वरुड, मोर्शी, धामणगावरेल्वे तसेच चांदूररेल्वे या तालुक्‍यांना रविवारी (ता. 11) पावसासह गारपिटीचा फटका बसला.

काही ठिकाणी गारपीट झाली नसली; तरी पावसामुळे शेतात असलेल्या हरभरा तसेच गव्हाचे पीक झोपण्याचे संकेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना परत एकदा आर्थिक विवंचनेला सामोरे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. विदर्भात रविवारी काही ठिकाणी वादळी व गारांचा पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली होती.
या गारपिटीने संत्राफळांसह आंब्याच्या मोहराचे मोठे नुकसान झाले आहे. संत्रा झाडावर मृगबहाराचे फळ सध्या आहे व आंबिया बहाराची फूट सुरू आहे.

या गारपिटीमुळे मृगबहाराचे सध्या दिसत नसले; तरी काही दिवसांत नुकसान होण्याचे संकेत आहेत. आंबिया बहार या गारपिटीमुळे गळून पडण्याचा धोका असून त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. बोंडअळीच्या हल्ल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आज आणखी एक संकट आले. गारपिटीने कोणीही जखमी झाल्याचे किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. 
 
Web Title: Marathi news Amravati news hailstorm in Amravati

Marathi news Amravati news hailstorm in Amravati अमरावती जिल्ह्यात गारपीटसह पाऊस | eSakal