कऱ्हाड: वाहतूक पोलिसांकडून 30 हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी येथून पुढे वाहतूक पोलिसांचे प्रयत्न राहणार आहेत. त्यासाठी पालिकेशी समन्वय साधून त्यावर तोडगा काढू. त्याशिवाय जेथे गरज आङे. तेथे पोलिस लावून तेथील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आमचा प्रयत्न राहिल.
- प्रदीप खाटमोडे, सहायक पोलिस निरिक्षक, कऱ्हाड शहर वाहतूक शाखा.
कऱ्हाड : शहरातील पोलिसांच्या वाहतूक शाखेने वर्षभरात केलेल्या सुमारे तीस हजार ८०८ वाहनांवर कारवाई करत सुमारे ८५ लाखांचा दंड वसूल केला आहे. मागील वर्षापेक्षा जास्त धडाकेबाज कारवाई करत पोलिसांनी यंदा सुमारे तीन लाख जास्त महसूल पोलिसांनी वसूल केला आहे.
मागील वर्षी 55 लाख 12 हजारांचा दंड वसूल केला होता. यंदा तोच आकडा ८५ लाखांवर गेला आहे. शहरासह परिसरात होणाऱ्या अवैध वाहतूकीवरही पोलिसांनी वचक ठेवत थेट कारवाईचा धडाका लावला आहे. यंदा 445 वाहनांवर कारवाई करत त्यांच्याकडून आठ लाख 56 हजारांचा दंड वसूल केला आहे.
शहर व 21 गावासाठी असलेल्या येथील शहर पोलिस ठाण्यात वाहतूक शाखेचेही काम चालते. सहायक पोलिस निरिक्षक प्रदीप खाटमोडे व सुमारे वीस कर्मचारी येथे कार्यरत आहेत. शहराला लागूनच महामार्ग असल्याने तेथे होणाऱ्या अपघातांसह वेगवेगळ्या घटनामुळे येथील वाहतूक नियंत्रण शाखेच्या कामाचा व्याप मोठा आहे. त्यातच शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवतानाही त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यासाठी वाहतूक शाखा कामांची विभागणी करताना दिसते. अलीकडेच वाहतूक साखेच्या नियंत्रणासाठी स्वतंत्र चार चाकी वाहनही मिळाले आहे. त्यामुळे बऱ्यापैकी त्यांना रिलीफ मिळाला असला तरी दैनंदीन काम करतानाही त्यांना अडचणी जाणवतानाच दिसतात. मात्र तरीही पोलिसांनी त्यांच्या कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. मागील वर्षी केलेल्या कारवाईपेक्षा यंदाच्या कारवायातून त्यांनी मोठा दंड वसूल केला आहे. अवैध प्रवासी वाहतूक, तिबलशीट, खराब नंबर प्लेट, नो पार्कींग यासारख्या अनेक कारवाया करताना पोलिसांनी बेडधक दंडाच्या कारवाया केल्या आहेत.
अवैध प्रवासी वाहतूकीवर नियंत्रणासाठी पोलिसांनी थेट कारवाया केल्या आहेत. गतवर्षी सुमारे 417 कारवाया झाल्या होत्या. यंदा त्या 445 वर गेल्या आहेत. त्यातून मागील वर्षापेक्षा तीन लाख २३ हजारांचा दंड अधिक वसूल आहे. मागील वर्षी पाच लाख 2800 इतका दंड वसूल केला होता. यंदा आठ लाख सहा 200 इतका दंड पोलिसांनी वसूल केला आहे. खराब नंबर प्लेट असलेल्या एक हजार 709 वाहानांवर कारवाई केली होती. यंदा दोन हजार 32 वाहनांवर कारवाई केली आहे. त्यातून मागील वर्षी एक लाख 95 हजार 900 इतका दंड वसूल झाला होता. तो यंदा चार लाख 7400 इतका आहे. बस स्थानकावर अनाधिकृत वाहन लावणाऱ्या दुचाकीवर कारवाईचा धडाक ठेवत पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यातून पाच 81 हजारांचा दंड वसूल केला आहे. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या सत्तर वाहन चालकांवर कारवाई केली आहे. त्यात प्रत्येक पाचशे रूपये प्रमाणे दंडही वसूल केला आहे. तिबलशीटच्या सुमारे 950 वाहनांवर कारवाई करत पोलिसांनी दोन लाखांचा दंड वसूल केला आहे. वर्षभरात पोलिसांनी सुमारे शंभर वाहनांवर थेट कारवाई करून त्याचे खटले न्यायालयात पाठवले आहेत. त्यातूनही प्रत्येक वाहानाला सरासरी दोनशे रूपयाप्रमाणे दंड झाला आहे. मुंबई पोलिस कायद्यान्वये सुमारे तीनशे दुचाकीधारकांवर कारवाई केली आहे. पोलिसांशी व पोलिसांनी अडवल्यानंतर होणाऱ्या वादावरही तोडगा काढण्यासाठी मागील वर्षी पंधरा लोकांवर थेट गुन्हे दाखल केले आहेत.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी येथून पुढे वाहतूक पोलिसांचे प्रयत्न राहणार आहेत. त्यासाठी पालिकेशी समन्वय साधून त्यावर तोडगा काढू. त्याशिवाय जेथे गरज आङे. तेथे पोलिस लावून तेथील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आमचा प्रयत्न राहिल.
- प्रदीप खाटमोडे, सहायक पोलिस निरिक्षक, कऱ्हाड शहर वाहतूक शाखा.