एटीएममधून आल्या 'चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया'च्या नोटा
दोन नागरिकांना एटीएममधून पैसे काढताना 'चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया'च्या नोटा आल्या आहेत. एकाने दहा हजार आणि एकाने 20 हजारांची रक्कम काढताना पाचशेच्या नोटांवर 'चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया' असे लिहिलेल्या बनावट नोटा त्यांना मिळाल्या.
कानपूर - शहरातील मार्बल मार्केट भागात ऍक्सिस बँकेच्या एटीएममधून चक्क 'चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया'च्या बनावट नोटा आल्याने खळबळ उडाली.
सचिन नावाच्या ग्राहकाने दिलेल्या माहितीनुसार, ऍक्सिस बँकेच्या या एटीएममधून मी दहा हजार रुपयांची रक्कम काढत असताना त्याला 'चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया'च्या बनावट नोटा आल्या. यानंतर मी एटीएमच्या सुरक्षा रक्षकाकडे तक्रार केली. त्या सुरक्षा रक्षकाने सोमवारी नोटा बदलून मिळतील असे सांगितले.
दोन नागरिकांना एटीएममधून पैसे काढताना 'चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया'च्या नोटा आल्या आहेत. एकाने दहा हजार आणि एकाने 20 हजारांची रक्कम काढताना पाचशेच्या नोटांवर 'चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया' असे लिहिलेल्या बनावट नोटा त्यांना मिळाल्या. एटीएम बंद करण्यात आले असून, तपास सुरु असल्याचे, पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.