e-Paper सोमवार, फेब्रुवारी 12, 2018

'अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करणार'

सकाळ वृत्तसेवा
04.52 AM

मुंबई - राज्यातील शिक्षकांची अशैक्षणिक कामातून मुक्तता करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दहिसर येथील शिक्षक परिषदेच्या बाराव्या द्वैवार्षिक अधिवेशनात दिले.

शिक्षकांच्या अशैक्षणिक कामातून मुक्तता करण्याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली आहे. याबाबत शिक्षण विभाग ग्रामविकास, नगरविकास, महसूल आदी संबंधित इतर महत्त्वाच्या विभागांशी बोलणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शनिवारी तावडेंनी उपस्थित शिक्षकांना आश्वासन दिल्यानंतर सभामंडपात जाऊनही शिक्षकांशी संवाद साधला.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी रविवारी अनेक ठराव मंजूर करण्यात आले. जुनी पेन्शन योजना, सातवा वेतन आयोग तातडीने लागू करणे, शिक्षकेतरांचा आकृतिबंध तत्काळ घोषित करावा, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, आदी ठराव मान्य करण्यात आले. यांसह शिक्षकांची पदे वर्ग तुकडीनिहाय मंजूर करावी, समुपदेशकांच्या प्रलंबित मागण्या मंजूर कराव्यात, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, आदी महत्त्वपूर्ण ठराव या वेळी घेतले गेले.

Web Title: mumbai news uneducated work teacher free vinod tawde

mumbai news uneducated work teacher free vinod tawde 'अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करणार' | eSakal