बीड जिल्ह्यात तीन तालुक्यांत गारपीट
मागील आठवडाभर जिल्ह्यात वातावरणात मोठा बदल झाला आहे. सुर्यदर्शन होत नसल्याने थंडीही वाढली आहे. रविवारी सकाळी माजलगाव, शिरुर कासार व गेवराई तालुक्यात गारपीट झाली.
बीड : मागील आठवडाभर वातावरणात बदल असून दिवस - दिवस सुर्यदर्शन होत नाही. रविवारी (ता. ११) सकाळ नंतर जिल्ह्यात गारपीटीसह पाऊस झाला. माजगाव, शिरुर कासार व गेवराई तालुक्यातील काही गावांत रस्त्यांवर गारांचा खच साचला.
मागील आठवडाभर जिल्ह्यात वातावरणात मोठा बदल झाला आहे. सुर्यदर्शन होत नसल्याने थंडीही वाढली आहे. रविवारी सकाळी माजलगाव, शिरुर कासार व गेवराई तालुक्यात गारपीट झाली. माजलगाव तालुक्यातील टाकरवण, काळेगाव, हिवरा, डुब्बाथडी या भागात गारपीट झाली. तर, गेवराई तालुक्यातील खळेगाव, पौळाचीवाडी येथेही गारपीटीसह जोरदार पाऊस झाला.
शिरुर तालुक्यातही गारपीट झाली. दरम्यान, गारपीटीमुळे रब्बी हरभरा, ज्वारी, गहू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वातावरणातील बदलामुळे पिकांवर रोगराईचा अंदाज शेती अभ्यासकांनी व्यक्त केला.