विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
गुरुवारी (ता. 8) सकाळी शेतात मक्याच्या शेताला पाणी देण्यासाठी शेतकरी पोपट पांडुरंग गायकवाड हे गेले होते. त्यांच्या शेतात लोंबकळणाऱ्या तारा होत्या. त्यांना या तारेतून विजेचा स्पर्श झाला. त्या वेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला.
टाकळी हाजी : शेतात तुटलेल्या तारांना स्पर्श झाल्याने मलठण (ता. शिरूर) येथील शेतकरी पोपट पांडुरंग गायकवाड (वय 48 ) यांचा मृत्यू झाला. अनेक वेळा महावितरणला येथील लोंबळकणाऱ्या तारांच्या तक्रारी केल्या. मात्र, संबंधित वायरमन निवृत्त होण्यास कमी कालावधी राहिल्याने ग्रामस्थांनी त्याला पाठीशी घातले होते. मात्र, हा बेजबाबदारपणा तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरला.
गुरुवारी (ता. 8) सकाळी शेतात मक्याच्या शेताला पाणी देण्यासाठी शेतकरी पोपट पांडुरंग गायकवाड हे गेले होते. त्यांच्या शेतात लोंबकळणाऱ्या तारा होत्या. त्यांना या तारेतून विजेचा स्पर्श झाला. त्या वेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या विरुद्ध दिशेला घासाच्या शेतात काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी घरी येऊन पती कुठेही दिसत नसल्याचे सांगितले. त्या वेळी त्यांचे भाऊ या दिशेने मोबाईलवरून शोध घेऊ लागले. त्या वेळी त्यांना हाताजवळ विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने भाऊ बेशुद्ध अवस्थेत असलेला दिसला. या घटनेला दोन दिवस होऊनही महावितरण अथवा पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली नाही. या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांनी दिली.