पिंपरीत एकाच दिवशी बलात्काराचे चार गुन्हे दाखल
पहिल्या गुन्हयामध्ये एका १४ वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. विशेष म्हणजे या घटनेतील आरोपीचे अजय हेच नाव माहिती असून त्याचा पत्ताही ठाऊक नाही. पिडित युवतीला आरोपी राजस्थान येथेही घेऊन गेल्याचे म्हटले आहे.
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात एकाच दिवशी शुक्रवारी (ता.९) सांगवी पोलिस ठाण्यात बलात्काराचे चार गुन्हे दाखल झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गुन्हयांमधील तीन पिडित अल्पवयीन आहेत.
पहिल्या गुन्हयामध्ये एका १४ वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. विशेष म्हणजे या घटनेतील आरोपीचे अजय हेच नाव माहिती असून त्याचा पत्ताही ठाऊक नाही. पिडित युवतीला आरोपी राजस्थान येथेही घेऊन गेल्याचे म्हटले आहे.
दुसऱ्या घटनेत १५ वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याची फिर्याद दाखल करण्यात आहे. हरी गोविंद राठोड (पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
तिसऱ्या घटनेत १७ वर्षीय युवतीवर अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी गणेश मारुती म्हस्के (रा. ताडीवाला रोड, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चौथ्या गुन्हयात ४२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. संतोष महाले (नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी महाले याने शेती खरेदी करू असे सांगत साडेसहा ला रूपये घेऊन गेला. तसेच फिर्दी महिलेस महालेच्या नातेवाईकांनी मारहाणही केली