e-Paper रविवार, फेब्रुवारी 11, 2018

'कॉन्स्टिट्युशन हिल'ची भेट..! 

सुनंदन लेले
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात मला क्रुगरच्या जंगलात जाऊन सफारी करण्याची संधी मिळाली, तशी टेबल माऊंटनवर जाऊन निसर्गाची मजाही लुटता आली. फ्रांचूक नावाच्या भागात जाऊन वाईन चाखता आली आणि मोठमोठ्या मॉलमध्ये जाऊन खरेदीची चमक-धमक अनुभवता आली. पण खरंच सांगतो.. सोवेतो भागातील नेल्सन मंडेला यांच्या मूळ घरी जाण्याचा अनुभव वेगळाच होता. तसेच, काल 'कॉन्स्टिट्युशन हिल' नावाच्या जागी गेलो होतो. तिथे गेल्यावर इतिहासाला वर्तमान आणि भविष्याशी नाते जोडताना पाहून भारावून गेलो. 

1892 मध्ये पॉल क्रुगर नावाच्या अधिकाऱ्याने पुरुष कैद्यांसाठी हा तुरुंग बांधला. त्याची जडण-घडण एखाद्या किल्ल्यासारखी भक्कम केली गेली. 1896 ते 1899 या कालावधीमध्ये ब्रिटिश आक्रमणापासून बचाव करण्यासाठीही हा तुरुंग वापरला गेला. 

19 वे शतक सुरू झाल्यावर या जागेचा वापर पुन्हा एकदा तुरुंग म्हणून करण्यात आला. सुरवातीला या तुरुंगात फक्त गोऱ्या वर्णाच्या कैद्यांनाच ठेवले जात असे. नंतर बराक क्रमांक चार आणि पाच चालू करून कृष्णवर्णीय कैद्यांनाही येथे ठेवले जाऊ लागले. यात भारतीय वंशांच्या कैद्यांचाही समावेश होता. 

बराक क्रमांक चारची क्षमता 30 कैद्यांची होती; पण तिथे 60 कैदी कोंबले जात असत. जेवणासाठी सर्वांना मोकळ्या अंगणात नेले जात असे आणि अर्धी बैठक मारलेल्या अवस्थेत जेवायला दिले जात असे. कैदी जेवायला बसत, त्याच्यासमोर मुद्दाम उघडे संडास असत. एकेकाळी 600 क्षमतेच्या या तुरुंगात 2000 कैदी होते. आठवड्यातून एकदा अंघोळ करण्यासाठी त्या सर्वांमध्ये मिळून आठ शॉवर्स होते. 

1906 मध्ये महात्मा गांधी यांना असहकार केल्याच्या आरोपाखाली शिक्षा म्हणून याच तुरुंगात ठेवण्यात आले होते. नेल्सन मंडेलादेखील याच तुरुंगात होते. या तुरुंगामध्ये शिस्त न पाळणाऱ्या कैद्याला एकांतवासाची आणखी कडक शिक्षा मिळायची. त्या कैद्याला 8 फूट बाय 3 फूटाच्या अंधाऱ्या खोलीत डांबले जायचे. इथे रोज सगळ्या कैद्यांची विवस्त्र करून तपासणी होत असे. त्यास महिलांचाही अपवाद नव्हता. 

दक्षिण आफ्रिकेतील हा अत्याचार अगदी नजीकच्या भूतकाळापर्यंत म्हणजे 1987 पर्यंत सुरू होता हे ऐकल्यावर हादरून जायला झाले. 

वर्णद्वेषी राजवटीचा अंत झाल्यावर या जागेला वेगळे महत्त्व आले. कारण ज्या जागी हक्कांना पायदळी तुडविण्यात आले, त्याच्याच शेजारी 'कॉन्स्टिट्युशनल कोर्ट' उभे करण्यात आले. देशाच्या घटनेचा पूर्ण मान राखत भविष्यात कधीही मानवी हक्कांची पायमल्ली होऊ नये, याची काळजी घेण्यात आली आहे. 

या वास्तूमध्ये एक जागा आहे.. त्याला 'आफ्रिकन फ्रीडम स्टेप्स' म्हणतात. डावीकडे भूतकाळातील भयानक इतिहास सांगणारा तुरुंग आणि उजव्या बाजूला भविष्याची काळजी घेणारे 'कॉन्स्टिट्युशनल कोर्ट' आहे. या भूतकाळ आणि भविष्यकाळाला जोडणाऱ्या पायऱ्यांची जागा म्हणजे 'आफ्रिकन फ्रीडम स्टेप्स'. 'कॉन्स्टिट्युशनल हिल'ला भेट देताना नेल्सन मंडेला आणि महात्मा गांधी यांच्यातील अमूर्त नाते फोटोच्या रुपाने मांडले आहे. एकंदरीतच 'कॉन्स्टिट्युशन हिल'ला दिलेली भेट सर्वार्थाने सार्थकी ठरली..! 

सुनंदन लेले 

इतर ब्लॉग्स

'कॉन्स्टिट्युशन हिल'ची भेट..!  | eSakal