e-Paper रविवार, फेब्रुवारी 11, 2018

गोळवळकर, हेडगेवारांचा पुतळा उभारावासा का वाटला नाही: राज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

सरदार वल्लभभाई पटेल हे जर देशाचे पंतप्रधान असते तर काश्मीर प्रश्न निर्माणच झाला नसता, असे मोदी यांनी या भाषणात म्हटले होते. पटेल यांना डावलून नेहरू यांना पंतप्रधान केल्याचाही दावा त्यांनी केला होता.

पुणे : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यंगचित्रातून बौद्धिक घेतले आहे. लोकसभा आणि राज्यसभा येथे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या ठरावावर चर्चा करताना मोदी यांनी काँग्रेसला जोरदार झोडपले होते. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेसच्या चुका त्यांनी या भाषणात दाखवल्या होत्या. मोदींनी व्यंगचित्रातून गांधीजींच्या मुखातून मोदी यांचे बौद्धिक घेतले आहे.

त्यावर व्यंगचित्रातील गांधीजी हे मोदींना इतिहास समजावून सांगताना राज यांनी दाखविले आहेत. गांधीजींच्या हातात `भारताचा इतिहास` हे पुस्तक दाखविण्यात आले आहे. `जवाहरलाल नेहरू यांना मी पंतप्रधान केले. काॅंग्रेसने नाही,` असे गांधीजी मोदींना सुनावत आहेत. `वल्लभभाई पटेल हे काँग्रेसचेच होते. त्यांचा पुतळा उभारावासा वाटला. मात्र गोळवळकर गुरूजी किंवा हेडगेवारांचा पुतळा उभारावासा का नाही वाटला. प्रचारक होताना तू?, असा सवाल गांधीजींनी केल्याचे राज यांनी दाखविले आहे. मोदी यांच्या पाठीशी अमित शहा यांना दाखवून राज यांनी व्यंगचित्रात आणखी गंमत आणली आहे.

Web Title: Marathi news MNS chief Raj Thackeray cartoon

Marathi news MNS chief Raj Thackeray cartoon गोळवळकर, हेडगेवारांचा पुतळा उभारावासा का वाटला नाही: राज | eSakal