e-Paper रविवार, फेब्रुवारी 11, 2018

मिलिंद एकबोटेंना शोधण्यासाठी मॉडर्नच्या प्राध्यापकांचा छळ 

उमेश घोंगडे
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास आम्ही गांभीर्याने करीत आहोत. मात्र चौकशीदरम्यान कर्मचारी व प्राध्यापकांशी चुकीच्या पद्धतीने कुणी अधिकारी वागला असेल तर त्यात स्वतः लक्ष घालू. 
- सुवेझ हक, पोलिस अधीक्षक

पुणे : कोरेगाव भीमा दंगलीतील संशयित आरोपी असलेले समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांचा शोध लागत नसल्याचा राग मनात धरून ग्रामीण पोलिसांनी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयांतील कर्मचारी व प्राध्यापकांचा विनाकारण छळ सुरू केला आहे. पोलिस चौकीत बोलावून दिवसभर बसवून ठेवणे, चौकशी करताना अर्वाच्य शिवीगाळ करणे, गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे असे प्रकार पोलिसांकडून सुरू आहेत. संस्थेच्या शाळा-महाविद्यालयांतील महिला प्राध्यापक तसेच प्राचार्यांचीही यातून सुटका झालेली नाही, हे विशेष. 

मिलिंद एकबोटे यांचे मोठे बंधू डॉ. गजानन एकबोटे हे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष आहेत. या संस्थेची विविध अभ्यासक्रमांची महाविद्यालये तसेच विविध ठिकाणी शाळादेखील आहेत. मिलिंद एकबोटे यांना डॉ. गजानन एकबोटे यांनी लपवून ठेवल्याच्या संशयावरून पोलिसांकडून गेल्या आठ दिवसांपासून संस्थेच्या शाळा, महाविद्यालयांची तपासणी सुरू आहे. मॉडर्न शिवाजीनगर, मॉडर्न गणेशखिंड, मॉडर्न एनसीएल या ठिकाणी प्राचार्यांच्या केबिनपासून सर्व आवारात मिलिंद एकबोटे यांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र ते सापडत नसल्याने चिडलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी डॉ. एकबोटे यांनाही धमकावण्याचा प्रयत्न केला. मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कल्याणी जोशी, एनसीएल कॅम्पसचे प्रमुख जगदीश चिंचोरे, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. झुंजारराव यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्यात आली. डॉ. झुंजारराव तसेच जोशी यांना तर गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली. गेल्या आठ दिवसांत शंभराहून अधिक कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावून घेण्यात आले. चौकशीची पद्धतही अजब आहे. सकाळी दहा वाजता पोलिस चौकीत बोलावून घ्यायचे. साहेब येणार आहेत, असे सांगून दिवसभर थांबवून रात्री नऊ-दहा वाजता घरी सोडायचे, जबाब लिहून घ्यायचे आणि गुन्हेगारांना रांगेत उभे करतात त्याप्रमाणे पीएच.डी. झालेल्या प्राध्यापकांनाही उभे करून धमकवायचे, असा प्रकार सुरू आहे. 

ज्यांनी मिलिंद एकबोटे यांना पाहिलेदेखील नाही, अशा अनेक प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचा आठ दिवसांपासून छळ सुरू आहे. पोलिसांनी केलेली शिवीगाळ सांगताना या प्राध्यापकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. या संदर्भातील पत्र संस्थेच्या वतीने पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला तसेच ग्रामीण पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांना देण्यात आले आहे. त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी करणारे स्वतंत्र पत्र संस्थेच्या वतीने मुख्यमंत्र्यांनाही देण्यात आले आहे. 

मिलिंद एकबोटे यांचा शोध घेण्याची पोलिसांची ही पद्धत अत्यंत अयोग्य आहे. सध्या बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा तसेच अभियांत्रिकीसह इतर सर्वच अभ्यासक्रमांच्या परीक्षा तसेच अंतर्गत मूल्यमापनाचे काम सुरू आहे. अशा वेळी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे त्रास देऊन मानसिक खच्चीकरण करण्याचे काम पोलिस करीत आहेत. त्यांनी एकबोटे यांचा शोध जरूर घ्यावा; मात्र त्यासाठी 62 घटक संस्था व या संस्थांमधून शिकणाऱ्या 52 हजार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करू नये. आमच्या लोकांचा छळ थांबवावा. 
- डॉ. गजानन एकबोटे, अध्यक्ष, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी 

Web Title: Marathi news Pune news Milind Ekbote Bhima Koregaon riot

Marathi news Pune news Milind Ekbote Bhima Koregaon riot मिलिंद एकबोटेंना शोधण्यासाठी मॉडर्नच्या प्राध्यापकांचा छळ  | eSakal