लष्करावरील हल्ल्यामागे रोहिंग्यांचा हात? : भाजप आमदार
श्रीनगर : 'जम्मूच्या आसपासच्या भागात बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांची संख्या वाढत आहे. याविषयी मी सातत्याने आवाज उठवत आहे. अशा घुसखोरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांना रोखले नाही, तर ते दहशतवाद्यांचे आश्रयदाते होतील', अशी भीती भाजपचे आमदार विक्रम रंधावा यांनी आज (शनिवार) व्यक्त केली. जम्मू-पठाणकोट रस्त्यावरील सुंजवान येथील लष्कराच्या तळावर आज पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात दोन अधिकारी हुतात्मा झाले.

या पार्श्वभूमीवर रंधावा म्हणाले, "बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्यांना रोखणे अत्यावश्यक आहे. ते दहशतवाद्यांना आश्रय देऊ शकतात. अशा घुसखोरांमधील काही जण दहशतवाद्यांशीही संबंधित असू शकतात. याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.''
जम्मू-काश्मीरच्या विधानसभेचे अध्यक्ष कवींद्र गुप्ता यांनीही या हल्ल्यासाठी रोहिंग्यांच्या वाढत्या संख्येला जबाबदार धरले. 'या भागात रोहिंग्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. रोहिंग्यांच्या बेकायदेशीर वस्त्यांचा या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका आहे', असे विधान गुप्ता यांनी केले.
यावरून विरोधी पक्षांनी गुप्ता यांच्यावर टीका केली आहे. 'एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करणारे विधान गुप्ता यांनी केले आहे. त्यांनी माफी मागेपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही' अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे.