पुणे: पूर्ववैमनस्यातून दुचाकी जाळली
हडपसर : पांढरेमळा येथे आज (शनिवार) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून दुचाकी जाळली. या आगीमुळे एका घरालादेखील आग लागली असून या घरातील विद्युत मीटर व काही वस्तू जळाल्या. नागरिकांनी प्रसंगावधान राखून आग विझविल्याने मोठी हानी टळली. ही घटना पूर्ववैमन्यस्यातून घडली असावी, असा पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

मिलिंद विठ्ठल मंदारे (वय ३३) असे त्या जळालेल्या दुचाकीच्या मालकाचे नाव आहे. या आगीत ताराबाई गायकवाड यांच्या घराला आग लागली. सकाळी पाणी भरण्यासाठी नागरिक उठले होते, त्यामुळे हा प्रकार एका महिलेच्या निदर्शनास आला. त्यानंतर महिलेने मदतीसाठी याचना केली. तेव्हा आग विझविण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले.
मंदारे म्हणाले, अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून गाडी पेटवली आहे. अग्निशामक केंद्राकडे तक्रार करूनही बंब घटनास्थळी पोहचला नाही. हडपसर पोलिस ठाण्यात जाऊन त्यांनी याबाबतची माहिती दिली. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली.
याबाबत हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विष्णू पवार म्हणाले, पूर्ववैमन्यस्यातून हा प्रकार घडला असावा. संशयित लोकांचा तपास सुरू असून तातडीने आरोपींना ताब्यात घेण्यात येईल.