...म्हणून रेल्वे करणार 13000 कर्मचाऱ्यांवर कारवाई
कोणतीही पूर्वसुचना न देता दीर्घकाळ गैरहजर राहिलेल्या अशा अधिकाऱ्यांची यादी रेल्वे प्रशासनाने तयार करण्यास सांगितले होते. त्यानुसार 13 लाख कर्मचाऱ्यांपैकी 13,500 कर्मचारी दांडीबहाद्दर असल्याचे समोर आले आहे. या अशा दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात येईल.
- रेल्वे प्रशासन
नवी दिल्ली : बेकायदेशीरपणे दीर्घकालीन सुट्टीवर गेलेल्या रेल्वेच्या तब्बल 13 हजार कर्मचाऱ्यांवर रेल्वेकडून कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे संकेत रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. सुट्टी घेताना अधिकृतपणे न सांगता गैरहजर राहिल्याने ही कारवाई केली जाणार आहे.
कोणतीही पूर्वसुचना न देता दीर्घकाळ गैरहजर राहिलेल्या अशा अधिकाऱ्यांची यादी रेल्वे प्रशासनाने तयार करण्यास सांगितले होते. त्यानुसार 13 लाख कर्मचाऱ्यांपैकी 13,500 कर्मचारी दांडीबहाद्दर असल्याचे समोर आले आहे. या अशा दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात येईल, असे रेल्वेकडून जारी केलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वेची सेवा आणि सुविधेबाबत सर्वसामान्य जनतेकडून प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यानंतर या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. या मोहिमेचाच हा एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.