e-Paper रविवार, फेब्रुवारी 11, 2018

नवा चित्रपट: आपला मानूस

शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

एका शहरात राहणाऱ्या गोखले कुटुंबाची ही गोष्ट. राहुल (सुमित राघवन) आणि भक्ती (इरावती हर्षे) यांच्या आयुष्यातील एका घटनेभोवती हा सिनेमा फिरताना दिसतो. बाप मुलगा आणि सून यांच्या त्रिकोणी कुटुंबात घडणारी एक घटना आणि त्याचा तपास करताना उलगडणारी नाती दिग्दर्शकाने व्यवस्थित मांडली आहेत.

सतीश राजवाडे यांचे दिग्दर्शन आणि नाना पाटेकर, सुमित राघवन आणि इरावती हर्षे यांचा उत्तम अभिनय याचं पॅकेज म्हणजे ‘आपला मानूस’ हा सिनेमा.

विवेक बेळे यांनी लिहिलेल्या नाटकावर आधारित हा सिनेमा आहे. एका घटनेचा आधार घेऊन एका कुटुंबातील नाती उलगडणारी कथा ही या सिनेमाची जमेची बाजू आहे. नाटकाचा सिनेमा बनवताना दिग्दर्शकाने प्रचंड मेहनत घेतल्याचं सिनेमा पाहताना जाणवतं. सिनेमातील प्रत्येक सिन प्रेक्षकाला धरून ठेवतो.

एका शहरात राहणाऱ्या गोखले कुटुंबाची ही गोष्ट. राहुल (सुमित राघवन) आणि भक्ती (इरावती हर्षे) यांच्या आयुष्यातील एका घटनेभोवती हा सिनेमा फिरताना दिसतो. बाप मुलगा आणि सून यांच्या त्रिकोणी कुटुंबात घडणारी एक घटना आणि त्याचा तपास करताना उलगडणारी नाती दिग्दर्शकाने व्यवस्थित मांडली आहेत. सिनेमाच्या सुरवातीलाच आबा घराच्या गॅलरीतून खाली पडतात. ही आत्महत्या की अपघात याचा तपास करण्यासाठी इन्स्पेक्टर मारुती नागरगोजे(नाना पाटेकर) आबांचा मुलगा राहुल आणि सून भक्ती यांची चौकशी करतात. या तपासादरम्यानच सगळी कथा उलगडत जाते.

हा तपास जसजसा पुढे सरकतो तशी या गोखले कुटुंबातील वाद, हेवेदावे यासोबतच त्यांच्यातील नाती उलगडत जातात. हा तपास करताना मारुती नागरगोजे समोर आलेल्या वेगवेगळ्या गोष्टी आणि त्यातून या सगळया तपासात उलगडली जाणारी कथा रंजक वाटते. एखाद्या घटनेकडे किती वेगवेगळ्या प्रकारे बघितले जाऊ शकते ते यात दिसते. हे सगळं घडत असताना हा सिनेमा कंटाळवाणा वाटत नाही. हा सिनेमा शेवटपर्यंत उत्सुकता ताणून धरतो.

एकूणच दोन पिढ्यांमधील नात्याची गुंतागुंत दाखवणारा दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा हा आणखी एक चांगला सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहायला हरकत नाही.

Web Title: entertainment news Aapla Manus movie review

entertainment news Aapla Manus movie review नवा चित्रपट: आपला मानूस | eSakal