बिअर पिणाऱ्या तरुणींची आम्हाला चिंता : मनोहर पर्रीकर
''तरुणांकडून केल्या जाणाऱ्या नशेच्या औषधांच्या (ड्रग्ज) वाढत्या दुरुपयोगामुळे आम्ही चिंतेत आहोत. तसेच बिअर पिण्याऱ्या तरूणींचीही आम्हाला चिंता आहे.''
- मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री, गोवा
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तरुणांच्या वाढत्या व्यसनाधिनेतबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ''तरुणांकडून केल्या जाणाऱ्या नशेच्या औषधांच्या (ड्रग्ज) वाढत्या दुरुपयोगामुळे आम्ही चिंतेत आहोत. तसेच बिअर पिण्याऱ्या तरूणींचीही आम्हाला चिंता आहे.''
गोमंतक मराठा समाज सभागृह येथे विधिमंडळ सचिवांकडून आयोजित 'राज्य युवक संसदेत' पर्रीकर बोलत होते. पर्यटनानिमित्ताने अनेक पर्यटक गोव्यात येत असतात. यातील बहुतांश पर्यटक येथे आल्यावर दारू, बिअर, ड्रग्ज यांसारखे व्यसन करत असतात. राज्यातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या व्यसनाधिनतेचा प्रश्न मोठा नसला तरीदेखील त्याबाबत आम्हाला काळजी वाटते. यामध्ये तरुणींचा व्यसनाधिनेतेचे प्रमाण कमी असले तरी ते चिंताजनक आहे. त्यामुळे आम्हाला त्यांच्या व्यसनाधिनेबाबतही चिंता वाटते, असे पर्रीकर म्हणाले.
दरम्यान, मागील वर्षी 13 ऑगस्ट रोजी आम्ही याबाबत सूचना दिल्या होत्या. ड्रग्ज घेतल्याप्रकरणी आतापर्यंत 170 जणांना अटक करण्यात आली. तसेच ज्या लोकांना कमी प्रमाणात ड्रग्जचे सेवन केले, अशा लोकांना 8-15 दिवसांत सोडण्यात आले, अशी माहितीही पर्रीकर यांनी दिली.