e-Paper रविवार, फेब्रुवारी 11, 2018

फोर्ब्जने जाहीर केली क्रिप्टोकरन्सी बाळगलेल्या श्रीमंतांची यादी

वृत्तसंस्था
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

फोर्ब्जने यंदा प्रथमच जाहीर केलेल्या यादीत 400 श्रीमंताचा समावेश करण्यात आलेला आहे. रिप्पलचे सहसंस्थापक क्रिस लार्सन या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे 7.5-8 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 51.2 हजार कोटी रुपये मूल्याची क्रिप्टोकरन्सी आहे. 

नवी दिल्ली: फोर्ब्जने यंदा प्रथमच क्रिप्टोकरन्सी बाळगलेल्या श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे. रिप्पलचे सहसंस्थापक क्रिस लार्सन या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे 7.5-8 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 51.2 हजार कोटी रुपये मूल्याची क्रिप्टोकरन्सी आहे. फोर्ब्जने यंदा प्रथमच जाहीर केलेल्या यादीत 400 श्रीमंताचा समावेश करण्यात आलेला आहे. यात तब्बल 67 अमेरिकी नागरिकांचा समावेश आहे. या यादीत फोर्ब्जने ४२ वर्षावरील श्रीमंतांचा समावेश केला आहे.

क्रिप्टोकरन्सीमध्ये बिटकॉइन, इंथेम आणि एक्सआरपी या क्रिप्टोकरन्सीवर गुंतवणूकदारांनी सर्वाधिक विश्वास दर्शविला आहे. क्रिस लार्सन यांच्यानंतर 5 अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या स्थानावर जोसेफ ल्युबिन, 2 अब्ज डॉलर्ससह तिसऱ्या स्थानावर चेंग पेंग झाओ, चौथ्या स्थानावर 1.1 अब्ज डॉलर्ससह कॅमेरन आणि पाचव्या स्थानावर 1 अब्ज डॉलर्स मॅथ्यु मेलन आहेत.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला बिटकॉइनला आता 'उतरती कळा' लागली आहे. काही काही दिवसांपूर्वी सर्व उच्चांक मोडीत काढणारा बिटकॉइन 8 हजार 964 अमेरिकी डॉलरवर येऊन पोचला आहे. भारतात देखील बिटकॉइन्सची लोकप्रियता वाढते आहे. मात्र बिटकॉइनला भारतात पसंती मिळत असल्याने रिझर्व्ह बॅंकेच्या (आरबीआय) चिंतेत भर घातली आहे. याचसाठी आरबीआयने देखील बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला होता. भारतासह जगात बिटकॉईन हे चलन अधिक लोकप्रिय असल्याने त्यात गुंतवणूक अधिक आहे.

Web Title: Forbes releases first cryptocurrency rich list; Chris Larsen at the top

Forbes releases first cryptocurrency rich list; Chris Larsen at the top फोर्ब्जने जाहीर केली क्रिप्टोकरन्सी बाळगलेल्या श्रीमंतांची यादी | eSakal