लग्नपत्रिकेवर कविता छापत प्रशांतने दिले आवतन
सध्याच्या सोशियल जमान्यात ब्लॉग, व्हाट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, युट्युब या माध्यमातून कविता लोकांपर्यंत पाठवण्याच माध्यम असतांना कविता ऐकणार्यापर्यंत गावा शिवा पर्यंत पोहचवण्यासाठी थेट निमंत्रण पत्रिकेवरच कविता छापत कवी प्रशांत केंदळे यांनी कवितेच सार्वात्रीकीकरन साहित्य व शिक्षण क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे.
खामखेडा (नाशिक) : आपली कविता वाचक व श्रोत्यापर्यंत जाण्यासाठी कुठल्या न कुठल्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचावी असचं बहुतेक कवींना वाटत असते. कविता गायन कवी संमेलन हे कविता सार्वजनिक स्वरुपात पाठवण्याचे पारंपारिक मार्ग. या पारंपारिक मार्गानुसार कविता गायनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर गावखेड्यात देखील होवू लागला आहे. मात्र नाशिकच्या साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध युवाकवी शिक्षक प्रशांत केंदळे यांनी आपली प्रसिद्ध कविता “अरे पावसा मातीशी कर लगीन साजर” आपल्याच विवाहाच्या निमंत्रण पत्रिकेवर छापत कविता लोकांपर्यंत पोहचवण्यासाठीचा व कविता कवीच्या कशी देहात ओतप्रत भरलेली असते हेच या उदाहरणावरून दिसुन येत असते.
नाशिक येथील प्रसिद्ध युवाकवी व नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेतील पेठे हायस्कूल येथे कार्यरत असलेले शिक्षक प्रशांत केंदळे यांनी आपल्या विवाहाच्या निमंत्रण पत्रिकेवर आपली प्रसिध्द कविता “आता पावसा मातीशी कर,लगीन साजर,गुल मोहराच कुकू तिच्या भांगा मधी भर,.हि लग्नाशी साधर्म्य दाखवणारी पाऊस अन माती याचं लग्न कवितेतून गुंफणार्या कवीने आपल्याच लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर आपली प्रसिद्ध कविता वापरत गणगोत व सग्या सोयर्यापर्यंत कविता पोहचवण्याची अनोखी पद्धत लक्षवेधी ठरली आहे.
सध्याच्या सोशियल जमान्यात ब्लॉग, व्हाट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, युट्युब या माध्यमातून कविता लोकांपर्यंत पाठवण्याच माध्यम असतांना कविता ऐकणार्यापर्यंत गावा शिवा पर्यंत पोहचवण्यासाठी थेट निमंत्रण पत्रिकेवरच कविता छापत कवी प्रशांत केंदळे यांनी कवितेच सार्वात्रीकीकरन साहित्य व शिक्षण क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे.
विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग असतो.हा सोहळा आगळावेगळा व्हावा असं प्रत्येकालाच वाटते.या साठी लग्न पत्रिका व ह्या पत्रीकांमधून मित्रमंडळी,सगेसोयरे,यांचे नावे सुटू दिली जात नाहीत.तशेच मुलगा अथवा मुलगी यांचे विशेष,शिक्षण हे पत्रिकेतील मुख्य विषय मात्र या सर्वच विषयांना फाटा देत नववधू व वर पिता व वधू पिता निमंत्रक,विवाहस्थळ,मुहर्त एवढेच पत्रिकेवर घेत आपली आवडती कविता या नवोदित युवा कविने कावितेच्याच स्वरुपातील आवतन कवितेवरील प्रेम मात्र लक्षवेधी ठरत आहे.
कविता महाराष्ट्रभर श्रोत्यांच्या पसंतीस उतरल्याने विवाह प्रसंगी मंगलाष्टके होण्याआधी कवी अभिजित शिंदे हि कविता म्हणणार आहेत. हे हि विशेष
- प्रशांत केंदळे, कवी