e-Paper शनिवार, फेब्रुवारी 10, 2018

शेतमाल तारण योजनेतून 22 कोटींचे वाटप - देशमुख

सकाळ वृत्तसेवा
04.06 AM

सोलापूर - राज्यात शेतमाल तारण योजनेमध्ये 307 बाजार समित्यांपैकी केवळ 121 बाजार समित्यांनी सहभाग घेतला आहे. या बाजार समित्यांच्या माध्यमातून तीन हजार 144 शेतकऱ्यांचा एक लाख 21 हजार 403 क्विंटल माल तारण ठेवला आहे. त्याबदल्यात शेतकऱ्यांना 22 कोटी 95 लाख रुपयांचे वाटप केले असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

राज्यात पुढील वर्षापासून गावातील विकास सोसायट्यांमार्फत पणन महामंडळ शेतमाल तारण योजना राबविण्यावर भर देणार आहे. त्यासाठी ज्या सोसायट्यांना गोडाऊनची गरज आहे, त्या सोसायट्यांनी गोडाऊन बांधण्यासाठी पणन महामंडळाकडे अर्ज करण्याचे आवाहनही सहकार व पणनमंत्री देशमुख यांनी केले. त्यासाठी पणन महामंडळ सोसायट्यांना मदत करण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
नेरपिंगळा (जिल्हा अमरावती) या गावातील विकास सोसायटीने 20 हजार क्विंटल शेतमाल तारण ठेवला आहे. जे बाजार समित्यांना शक्‍य झाले नाही ते एका गावातील विकास सोसायटीने शक्‍य करून दाखविले आहे. गावातील विकास सोसायट्यांबरोबरच शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही शेतमाल तारण कर्ज योजना सुरू करण्यास परवानगी दिली जाणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

कर्जमाफीचा विषय गुरुवारपर्यंत संपवा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचा पहिला टप्पा गुरुवारपर्यंत (ता. 15) पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सहकार विभागाने कामकाज सुरू केले आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर नव्याने ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

Web Title: solapur news agriculture goods surety scheme money distribution subhash deshmukh

solapur news agriculture goods surety scheme money distribution subhash deshmukh शेतमाल तारण योजनेतून 22 कोटींचे वाटप - देशमुख | eSakal