नाशिक- कर्मचाऱ्यांच्या आधीच आयुक्त मुंढे पालिकेत हजर
शिस्तप्रिय अधिकारी म्हणून प्रसिध्द असलेले तुकाराम मुंढे यांनी आज पदाचा कार्यभार स्विकारला. आतापर्यंत मुंढे यांच्या कामकाजाची पध्दत फक्त ऐकिवात होती परंतू पालिका मुख्यालयाच्या पायऱ्या चढण्यापासूनचं कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कामाचा अनुभव घेतला. कर्मचारी कार्यालयात हजर होण्यापुर्वीचं मुंढे पालिका मुख्यालयात हजर झाल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. पदभार स्विकारण्याचा सोपस्कार अर्धा तासात पार पाडल्यानंतर विभाग प्रमुखांची बैठकीला वेळेत हजर न राहिलेले अग्निशमन दल प्रमुख अनिल महाजन यांना आज तुमची सुट्टी असे सांगून कामाची चुणूक दाखवून दिल्याने अधिकारी वर्गात खळबळ उडाली.
नाशिक - शिस्तप्रिय अधिकारी म्हणून प्रसिध्द असलेले तुकाराम मुंढे यांनी आज पदाचा कार्यभार स्विकारला. आतापर्यंत मुंढे यांच्या कामकाजाची पध्दत फक्त ऐकिवात होती परंतू पालिका मुख्यालयाच्या पायऱ्या चढण्यापासूनचं कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कामाचा अनुभव घेतला. कर्मचारी कार्यालयात हजर होण्यापुर्वीचं मुंढे पालिका मुख्यालयात हजर झाल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. पदभार स्विकारण्याचा सोपस्कार अर्धा तासात पार पाडल्यानंतर विभाग प्रमुखांची बैठकीला वेळेत हजर न राहिलेले अग्निशमन दल प्रमुख अनिल महाजन यांना आज तुमची सुट्टी असे सांगून कामाची चुणूक दाखवून दिल्याने अधिकारी वर्गात खळबळ उडाली.
महापालिकेचे मावळते आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी पदाचा कार्यभार कर्मचाऱ्यांमार्फत नुतन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपविला. आज सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास आयुक्त मुंढे यांचे प्रशासनाच्या वतीने शासकीय विश्रामगृहावर स्वागत करण्यात आले. पालिका मुख्यालयात दहा वाजण्यापुर्वीचं मुंढे यांनी एन्ट्री केल्याने सुरक्षा रक्षकांसह उपस्थित कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. आयुक्त पालिकेत हजर झाल्याचे कळताचं कर्मचारी धावपळ करतं पालिकेत हजर झाले. आयुक्त कार्यालयाकडे जात असतानाचं कार्यालयाची माहिती जाणून घेतली. आयुक्त कार्यालयाकडे प्रवेश करतं असतानाचं स्थायी समितीचे कार्यालय कुठे आहे याबाबत त्यांनी विचारणा केली. विशेष म्हणजे तेथे काही वेळ थांबून मुंढे यांनी पाहणी केली. अतिरिक्त आयुक्त कार्यालयाची देखील पाहणी केली.
महाजनांना सुट्टी, आरोग्य अधिकाऱ्यांना खडसावले
दहा वाजून दहा मिनीटांनी आयुक्त पदाचा रितसर पदभार स्विकारल्यानंतर विभाग प्रमुखांची बैठक बोलाविण्यात आली. बैठकीला अग्निशमन विभागाचे प्रमुख अनिल महाजन उशिराने दाखल झाले. शिस्तप्रिय असलेल्या मुंढे यांना हि बाब खटकल्याने आज तुमची सुट्टी म्हणून त्यांना रजेवर पाठविले. पालिका मुख्यालयातीलचं शौचालयांची दुरावस्था असल्याने आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल बुकाणे यांना सुध्दा तंबी दिल्याचे समजते. पदभार घेतल्यानंतर पहिल्या तासाभरातचं आयुक्तांनी त्यांच्या शिस्तप्रियतेला अनुसरून काम सुरु केल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.