सोलापूर : मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकुळ, महिलेचा खून करून लुबाडले दागिने
मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्याच्या दक्षिण भागात सीमेवर असलेल्या सोड्डी गावात मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून, गळयातील सोन्याचे दागिने हिसकावून घेण्यास विरोध केला म्हणून कस्तुरी रामण्णा बिराजदार (वय 60) या महिलेचा खून करण्यात आला असून मलकाप्पा रेवगोंडा बिराजदार (वय 60) यांना गंभीर जखमी करण्यात आले आहे. तसेच, अन्य दोन घरे फोडून चोरी करण्यात आली. चोरी प्रकरणाने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जखमीस उपचारासाठी जतला नेण्यात आले.

पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी यांनी सकाळी घटनास्थळी भेट दिली असून वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. या गावातील बहुसंख्य लोक पोटाची उपजिवीका करण्यासाठी सांगली व कोल्हापूर भागात ऊसतोडणीसाठी गेले असून गावात वयोवृध्द महिला असून हे गाव कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवर असल्याने दरोडेखोरांना चोरी करुन कर्नाटकाचा आसरा घेणे शक्य होते या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.