सातारा जिल्ह्यातील दोघे नेर्लेजवळ अपघातात ठार
नेर्ले - वाळवा तालुक्यातील नेर्ले येथील राष्ट्रीय महामार्गवरील हाॅटेल दत्तभुवन जवळ झालेल्या अपघातात दोन युवक ठार झाले आहेत. आबासो यशवंत मोटे (वय 38) व राजाराम आत्माराम थोरात (वय 30 दोघेही रा कालवडे ता कराड जि सातारा) अशी त्यांची नावे आहेत.

मोटे व थोरात हे दोघेही पेठ येथील बॉम्बे रेयॉन येथे कामास होते. काम संपल्यावर घरी जात असताना नेर्ले येथील हॉटेल दत्त भुवन जवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारीने धडक दिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कासेगाव पोलिसात या अपघाताची नोंद झाली आहे.