लग्नातील अवास्तव खर्च टाळून शाळेला मदत
अंगापूर - आदर्शगाव धोंडेवाडी (ता.सातारा) येथील महेश भोसले यांनी स्वत:च्या लग्नातील अवास्तव खर्चाला फाटा देत ती रक्कम गावातील शाळेतील मुलांना शैक्षणिक भेटीस इतर ठिकाणी जाण्यासाठी उपयोगी पडावी म्हणून देत एक नवा पायंडा आजच्या नवतरुणांपुढे ठेवला आहे.

मोरगाव (जि. पुणे) येथे निवृत्त आयपीएस पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांच्या संकल्पनेतून ‘कुडाची शाळा’ हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पातून अनेक शालेय उपक्रम राबविले जात आहेत. जेणेकरून यातून मुलांमध्ये शिक्षणाची आस व अभ्यासाची गोडी लागावी, हा एकमेव उद्देश ठेवला आहे. या प्रकल्पाला भेट देण्याकरिता गावातील शालेय मुलांना जाता यावे म्हणून शिक्षण यात्रेचे आयोजन या रकमेतून करता यावे व काही तरी विधायक घडावे, यासाठी श्री. भोसले यांनी स्वत:च्या लग्नादिवशी ही रक्कम शाळेच्या मुख्याध्यापिका चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केली.
महेश भोसले व विद्या यांचा विवाह १८ जानेवारी रोजी झाला. त्यात इतर लग्नांप्रमाणे घोडा, बॅंडबाजा व इतर कोणत्याही प्रकारचा डामडौल न करता स्वत: महेश व त्यांच्या कुटुंबीयांनी या सर्व अनावश्यक खर्चाला बाजूला सारत या गोष्टींसाठी खर्च होणारी सर्व रक्कम गावातील शाळेला शैक्षणिक कार्यासाठी सुपूर्द केली.