वाडा पुर्नवसन ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सहारा तांबोळी
टाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे): वाडा पुर्नवसन (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सहारा इरफान तांबोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे परीसरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

शिरूर तालुक्यातील वाडा हे गाव पुर्नवसन केलेले गाव आहे. या ग्रामपंचायतची 7 सदस्य संख्या आहे. सरपंच उज्वला सुनील पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंच पदाची जागा रिक्त झाली होती. सरपंचपदाची निवडणूक जाहिर झाल्यावर सहारा इरफान तांबोळी यांचा एकमेव अर्ज आला होता, त्यानंतर त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले. यासाठी उपसरपंच बाळासाहेब दत्तात्रेय वाडेकर यांनी सुचक म्हणून काम केले. निवडणूक निर्णय अधिकारी डी. व्ही. कावळे व ग्रामविकास अधिकारी एस. व्ही. डफळ यांनी काम पाहिले.
|
सहारा यांच्या निवडीनंतर शिरूर तालुका तांबोळी समाजाचे अध्यक्ष युनूस तांबोळी, दर्शना नायर, सुषमा माळी, विकास कोळेकर. रामदास नायकुडे, राजूरीचे हाजी शब्बीरभाई तांबोळी, वाडा (ता. खेड) चे माजी सरपंच जाकीर तांबोळी यांनी त्यांचे अभीनंदन केले आहे.