e-Paper शनिवार, फेब्रुवारी 10, 2018

विमानतळावर परदेशी चलन जप्त

सकाळ वृत्तसेवा
05.05 AM

मुंबई - हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) सहार विमानतळावर केलेल्या एका कारवाईत एक कोटी 25 लाख 87 हजार रुपयांचे परदेशी चलन जप्त केले. यंदाच्या वर्षातील ही मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते. भारतीय पारपत्रावर मोहम्मद फराज अख्तर उपलेटावाला हा हॉंगकॉंगला जाणार होता; तसेच या प्रवाशाकडे मोठ्या प्रमाणात परदेशी चलन असल्याची माहिती मिळाल्यानुसार बुधवारी (ता. 7) अधिकाऱ्यांनी विमानतळावर सापळा रचला होता. मोहम्मद विमानतळावर आल्यावर त्याच्या बॅगेची झडती घेण्यात आली. तेव्हा या बॅगेत दोन लाख अमेरिकन डॉलर, हॉंगकॉंग व चीनचे चलन सापडले. जप्त केलेल्या या चलनाची भारतीय बाजारातील किंमत एक कोटी 25 लाख 87 हजार इतकी आहे. सीमा शुल्क कायद्याखाली त्याचा जबाब नोंदवून घेतल्यावर तस्करीतील चलन जप्त करत मोहम्मदला एआययूच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.
Web Title: mumbai news airport foreign currency seized

mumbai news airport foreign currency seized विमानतळावर परदेशी चलन जप्त | eSakal