जॅकलिनचं "एक दो तीन'
धकधक गर्ल माधुरी दीक्षितने "एक दोन तीन...' या गाण्यावर बहारदार नृत्य करून सर्वांना थिरकायला लावलं होतं. आजही हे गाणं एव्हरग्रीन आहे. आता म्हणे या गाण्याचं नवं व्हर्जन रसिकांच्या भेटीला येणार आहे. टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी यांची मुख्य भूमिका असलेला आगामी चित्रपट "बागी-2'मध्ये हे गाणं पाहायला मिळणार आहे आणि या गाण्यावर थिरकणार आहे अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या चालीवर बनलेल्या "एक दो तीन' या गाण्याला अलका याज्ञिक यांनी स्वरसाज दिला होता. सरोज खान यांनी हे गाणे कोरिओग्राफ केलं होतं. आता याच गाण्याचं नवं व्हर्जन दिग्दर्शक अहमद खान आणत आहेत.
धकधक गर्ल माधुरी दीक्षितने "एक दोन तीन...' या गाण्यावर बहारदार नृत्य करून सर्वांना थिरकायला लावलं होतं. आजही हे गाणं एव्हरग्रीन आहे. आता म्हणे या गाण्याचं नवं व्हर्जन रसिकांच्या भेटीला येणार आहे. टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी यांची मुख्य भूमिका असलेला आगामी चित्रपट "बागी-2'मध्ये हे गाणं पाहायला मिळणार आहे आणि या गाण्यावर थिरकणार आहे अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या चालीवर बनलेल्या "एक दो तीन' या गाण्याला अलका याज्ञिक यांनी स्वरसाज दिला होता. सरोज खान यांनी हे गाणे कोरिओग्राफ केलं होतं. आता याच गाण्याचं नवं व्हर्जन दिग्दर्शक अहमद खान आणत आहेत. माधुरीच्या या गाण्याला लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. आता जॅकलिनचं आयटम सॉंग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतं का, हे पाहावं लागेल.