पहिले राष्ट्रीय किर्तनकार आमले महाराज यांचे निधन
अकोला : वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे प्रचार प्रचार करण्याकरीता जीवन वाहिलेले राष्ट्रिय किर्तनकार त्र्यंबकराव आमले महाराज यांचे ह्दय विकाराच्या तीव्र झटक्याने आज गुरुवार (ता.८) निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते.

अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे पहीले राष्ट्रीय किर्तनकार म्हणून त्यांची ओळख होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांचा सहवास त्यांना लाभला आहे. राष्ट्रसंत व गाडगेबाबांसोबत त्यांनी विचारधारा पुढे नेण्याचे काम अविरतपणे केले आहे. राष्ट्रसंताच्या कार्याचा, त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा याकरीता संपुर्ण जिवन त्यांनी वाहुन घेतले. गरुदेव सेवा मंडळाने राष्ट्रीय किर्तनाची पंरपरा सुरू केली. यामध्ये ते आद्य किर्तनकार म्हणुन ओळखले जातात. अगदी लहानपासूनच त्यांनी राष्ट्रसंताच्या कार्यासाठी वाहुन घेतले आहे. गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचार प्रसारासाठी गावोगावी जावून त्यांनी प्रचार-प्रसार केला. आयुष्यभर त्यांनी राष्ट्रसंतांच्या विचारांचा यज्ञकुंड धगधगत ठेवला. आमले महाराजांच्या निधनाने गुुरुदेव भक्तांवर खुप मोठी शोककळा पसरली आहे. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. त्यांची अंतयात्रा भिसे यांच्या चक्कीजवळ, न्यु खेतान नगर येथून ४ वाजता कौलखेड मोक्षधामाकरीता निघणार आहे.