e-Paper शनिवार, फेब्रुवारी 10, 2018

'पंचायत राज'ने चाखली हुरड्याची चव

सकाळ वृत्तसेवा
04.22 AM

सोलापूर - पंचायत राज समिती गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. शुक्रवारी शेवटच्या दिवशी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील शेतामध्ये समितीच्या अध्यक्षांसह इतर सदस्यांनी हुरड्याची चव चाखली. हुरड्याच्या माध्यमातून या समितीने शिवारफेरीच केली. सहकारमंत्री सुभाष देशमुख व भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या आग्रहाच्या निमंत्रणामुळे समिती सदस्यांना हुरड्याचा आस्वाद घेता आला.

पंचायत राज समितीचे सदस्य शासकीय कामामध्ये कोणताही अडसर येऊ नये, यासाठी आज सकाळीच पवार यांच्या शेतामध्ये आले. त्याच्या स्वागतासाठी भव्य शामियाना तयार केला होता. त्यासमोर हुरडा भाजण्यासाठी चार आकट्याही (खड्डा) पेटविलेल्या होत्या. त्यामध्ये भाजून हुरडा समिती सदस्यांना दिला जात होता. हुरड्याबरोबर तोंडी लावण्यासाठी सोलापूरची प्रसिद्ध शेंगाचटणी, फरसाण, लसूण घालून केलेले शेंगाचे कूट, गुळाचे खडे त्याचबरोबर नान्नजची प्रसिद्ध द्राक्षही सदस्यांच्या दिमतीला होती. समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात आलेल्या वेगवेगळ्या भागातील आमदारांनी हुरड्याच्या रानमेव्यावर मनसोक्त ताव मारला व मठ्याचाही आस्वाद घेतला. नाश्‍त्याच्या जोडीला डेझर्टमध्ये फ्रूट सॅलडही होते.

Web Title: solapur news hurda party panchyat committee

solapur news hurda party panchyat committee 'पंचायत राज'ने चाखली हुरड्याची चव | eSakal