बावीस हजार किलो मीटर रस्ते चौपदरी होणार - चंद्रकांत पाटील
22 हजार किलो मीटरचे रस्ते चौपदरीकरण करण्यात येणार आहेत. येत्या तीन वर्षाच्या काळात हे काम पुर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी एक लाख सहा हजार कोटी रुपयाचा निधी केद्र शासनाकडुन उपलब्ध होणार आहे, अशी माहिती राज्याचे बांधकाम मंत्री चद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकारांना दिली.
सावंतवाडी - जागा संपादित करण्यासाठी येणार्या अडचणी लक्षात घेता दुपदरी आणि अतिवापर असलेले राज्यातील रस्ते तीन पदरी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याच बरोबर 22 हजार किलो मीटरचे रस्ते चौपदरीकरण करण्यात येणार आहेत. येत्या तीन वर्षाच्या काळात हे काम पुर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी एक लाख सहा हजार कोटी रुपयाचा निधी केद्र शासनाकडुन उपलब्ध होणार आहे, अशी माहिती राज्याचे बांधकाम मंत्री चद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकारांना दिली.
दरम्यान येणार्या काळात ग्रामीण भागातील रस्त्याची परिस्थिती सुधारली जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने इतिहासात पहिल्यांदाच तीस हजार कोटींची व्यवस्था केली आहे यातून दहा हजार किलोमीटरचे रस्ते तीन पदरी करण्यात येणार आहेत, असे ही त्यांनी यावेळी सांगितले
श्री. पाटील यांनी आज येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात अभियंत्यांशी चर्चा केली. त्यानंतर उपस्थित पत्रकारांशी चर्चा करताना त्यांनी ही माहीती दिली. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे प्रदिप व्हटकर, अनामिका चव्हाण, विजय चव्हाण, राजन चव्हाण यांच्यासह आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, अतुल काळसेकर, महेश सारंग, आनंद नेवगी, राजू राऊळ, मनोज नाईक आदी उपस्थित होते
पत्रकारांशी अधिक बोलण्यास पाटील यांचा नकार
या ठिकाणी आलेल्या श्री पाटील यांच्याशी पत्रकारांनी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र तुम्ही काही निवेदन करायचे नाही प्रश्न विचारायचे नाहीत. मी सांगेन तेच ऐकायचे. असे असेल तर मी तुमच्याशी बोलतो, असे सांगुन श्री पाटील यांनी उपस्थित पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला.