‘यादों की वरात’च्या शुभारंभाचा प्रयोग
पुणे - माणसाला नको असलेल्या, अस्वस्थ करणाऱ्या आठवणी मेंदूतून पुसता आल्या तर...वास्तवात नसले तरी नाटकात हे नक्की शक्य आहे. असाच विचार करायला लागणाऱ्या भन्नाट विनोदी आशयावर बेतलेल्या ‘यादों की वरात’ या नवीन नाटकाचा प्रयोग ‘सकाळ-सह्याद्री सुरक्षा कवच’च्या सभासदांसाठी आयोजित करण्यात आला आहे. सभासदांसाठी वर्षभर होणाऱ्या विनामूल्य कार्यक्रमांतील हा शुभारंभाचा कार्यक्रम आहे. येत्या मंगळवारी (ता. १३) बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी १२.३० वाजता आणि सायंकाळी ५ वाजता असे दोन प्रयोग होतील.

‘छडा’ या यशस्वी नाटकानंतर अवनीश प्रॉडक्शनचे निर्माते महेश रामचंद्र ओवे यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. लेखन आणि दिग्दर्शन निखिल रत्नपारखी यांनी केले असून, नाटकात त्यांनी प्रमुख भूमिकाही साकारली आहे.
‘यादों की वरात’ आपापल्या मेंदूतून एकमेकांच्या आठवणी पुसून टाकणाऱ्या पती आणि पत्नीमधील कडू-गोड गमतीदार प्रसंगावर आधारित आहे.
अभिनेता, विनोदवीर, लेखक व दिग्दर्शक म्हणून निखिल रत्नपारखी विविध विनोदी पार्श्वभूमी असलेल्या जाहिराती, मालिका व चित्रपटांद्वारे घराघरांत पोचले आहेत. ‘यादों की वरात’ हा आगळावेगळा विषय प्रेक्षकांसमोर आणताना रत्नपारखी यांनी लेखक, दिग्दर्शक व अभिनेता या तिन्ही जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या सांभाळल्या आहेत. नाटकात त्यांच्यासोबत भक्ती रत्नपारखी, तुषार गवारे, तारका पेडणेकर व विनायक कदम यांच्या भूमिका आहेत.
नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळे व प्रकाश शीतल तळपदे, संगीत गांधार संगोराम, वेशभूषा कमल खान यांची आहे, तर सूत्रधार मंगेश कांबळी आहेत.
सभासदांसाठी सूचना
सभासद व कुटुंबीयांतील एका व्यक्तीला विनामूल्य प्रवेश
सभासद शुक्रवारी (ता. ९) सकाळी ११ पासून ९०७५०१११४२ या (व्हॉट्सॲप) क्रमांकावर किंवा ७७२१९८४४४२ या क्रमांकावर नावनोंदणी करू शकतात. नोंदणीच्या वेळी नाटकाच्या प्रयोगाची वेळ सांगून नोंदणी करावी. नोंदणी केलेल्या वेळेस होणाऱ्या प्रयोगाला उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
नाटकाच्या १५ मिनिटे आधी प्रवेश दिला जाईल.
सभासदांनी येताना ओळखपत्र व माहिती पुस्तिकेतील पहिल्या क्रमांकाची प्रवेशिका व सभासद कार्ड आणणे आवश्यक
काही जागा राखीव