e-Paper शुक्रवार, फेब्रुवारी 9, 2018

सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत नक्षल कमांडर ठार

वृत्तसंस्था
02.21 AM

राजधानी रायपूरपासून 450 किमीवर असलेल्या दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात विशेष टास्क फोर्स आणि जिल्हा राखीव पोलिस दल संयुक्तपणे कारवाई करीत होते, त्या वेळी दोकापारा येथे नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू केला. त्या वेळी सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक उडाली

रायपूर - छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त जिल्हा असलेल्या दंतेवाडात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत नक्षल कमांडर ठार झाल्याचे आज पोलिसांनी सांगितले.

सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध संयुक्त मोहीम सुरू केल्यानंतर बुधवारी रात्री दोकापाराच्या जंगलात ही चकमक घडली. किरनडुल पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही चकमक झाली, असे दंतेवाडाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक गोरखनाथ बघेल यांनी सांगितले. राजधानी रायपूरपासून 450 किमीवर असलेल्या दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात विशेष टास्क फोर्स आणि जिल्हा राखीव पोलिस दल संयुक्तपणे कारवाई करीत होते, त्या वेळी दोकापारा येथे नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू केला. त्या वेळी सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक उडाली, असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक बघेल यांनी सांगितले.

या चकमकीत एक नक्षल कमांडर ठार झाला. सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून 315 बोरची एक बंदूक जप्त केली आहे, असे ते म्हणाले.

Web Title: maoist encounter

maoist encounter सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत नक्षल कमांडर ठार | eSakal