पुणे : पिंपरीत वाहनचोरांकडून चार गुन्हे उघडकीस
पिंपरी (पुणे) : पळून चाललेल्या वाहन चोरांचा पाठलाग करून पिंपरी पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. या वाहन चोरांकडून चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
सतीश दादाराव लोंढे (वय 22, रा. यशवंतनगर, पिंपरी), संतोष बबन लोंढे (वय 29, रा. गवळीमाथा, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. एका अल्पवयीन मुलासही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडूनही चोरीची एक दुचाकी हस्तगत करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 फेब्रुवारीला पोलिस गस्त घालत असताना डॉ. डी. वाय. पाटील परिसरातून एका दुचाकीवरून दोघेजण वेगात जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते आणखी वेगात पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. पळून जाण्याचे कारण विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी दुचाकीची कागदपत्रे मागितली असता आपल्याकडे कागदपत्र नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना पिंपरी पोलिस ठाण्यात आणून विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांनी सदरची दुचाकी चोरीची असल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच आणखी दोन दुचाकी चोरी केल्याची कबुलीही दिली.
पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या. तसेच पोलिसांनी एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन त्याच्याकडूनही चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या. वाहन चोरांकडून पिंपरी पोलिसांनी एक लाख 40 हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी हस्तगत केल्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीधर जाधव, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, बाळासाहेब अंतरकर, पोलिस हवालदार नागनाथ लकडे, शाकीर जिनेडी, राजेंद्र भोसले, महादेव जावळे, दादा धस, नीलेश भागवत, रोहित पिंजरकर, नितीन सूर्यवंशी, अविनाश देशमुख, संतोष भालेराव, यांच्या पथकाने ही कामगिरी केली.