केंद्रीयमंत्री गिरीराज सिंग यांच्याविरोधात एफआयआर दाखल
गिरीराज सिंग यांच्यासह अन्य 33 जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. दनापूर पोलिस ठाण्यात या सर्वांविरोधात जमीन हडपल्याच्या आरोपावरून एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेले गिरीराज सिंग यांच्यासह अन्य 33 जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. दनापूर पोलिस ठाण्यात या सर्वांविरोधात जमीन हडपल्याच्या आरोपावरून एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
लघू, मध्यम उद्योग मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार गिरीराज सिंग यांच्याकडे आहे. गिरीराज सिंग यांनी दनापूर येथील दोन एकर जमीन राजकीय दबावातून हडपल्याचे आरोप त्यांच्यावर आहे. याबाबत राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यादव यांनी पटना न्यायालयातील गिरीराज सिंग यांच्या खटल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच कोट्यवधींची रोकड गिरीराज सिंग यांच्याकडून हस्तगत करण्यात आली. तरीदेखील ते प्रामाणिक व्यक्ती कसे असू शकता, अशा शब्दांत यादव यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दरम्यान, नवाडाचे खासदार असलेलेे गिरीराज सिंग यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाल्याने त्यांच्यावर पुढे काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.